baba redikar goshala

आमच्याविषयी

आमचे कार्य


भारतीय संस्कृतीमध्ये १२ वर्षाच्या काळाला एक तप म्हटले आहे. तप म्हणजे तपश्चर्या. नित्य निरंतर एकच ध्यास भारतीय वंशाच्या (देशी वंशाचा) गायीची सेवा दीड तपाचा कालावधी लोटला. काटेभोगाव, ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर सह्याद्री रांगेतील तामजाई पठारावरती पाय घट्ट रोवून, सोई सुविधांची तमा न बाळगता कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य, पाठबळ नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाश्रय नसताना सुरवातीस तीन चार वर्षे आंतरिक इच्छाशक्तीच्या जोरावरती स्थानिक नैसर्गिक सामग्री (गायींना पाणी पिण्यासाठी लहानसा झरा, झोपडी उभारण्यासाठी स्वतःची जागा आणि जंगली लाकूड फाटा, गवत पालापाचोळा) एवढाच आधार होता. आबा कांबळे, त्यांच्या पत्नी आनंदीबाई, मुलगा रमाकांत, लहान मुलगा नामानंद, सुना मंदाकिनी व सुनंदा, मुलगी प्रमिला या सर्व परिवाराने मनुष्य वस्तीपासून सुमारे चार किमी दूर वन्य पशूंच्या सहवासात डोंगरावरती राहून गो-सेवेच्या कामाला दि १८ एप्रिल १९९९ पासून सुरवात केली.

cows
सर्वोदयवाल्यांचे लक्ष

कोण बाबा रेडीकर? बाबा रेडीकर हे एक भूदान ग्रामदान चळवळीतील कार्यकर्ते आहेत. आचार्य विनोबा भावेंनी कोल्हापूर जिल्ह्याचे संयोजक म्हणून त्यांची नेमणूक केली होती. प्रभाकरपंत कोरगावकरानी चालविलेल्या विनयकुमार छात्रालयात ग्रामस्वराज्य आश्रम स्थापून कोल्हापूर जिल्ह्याची त्यांनी खूप सेवा केली आहे. त्यांच्या सेवामय त्यागी जीवनाचा आदर्श घेऊन आबा कांबळे यांनी ग्रामसेवकाची नोकरी सोडून भूदान ग्रामदान ग्रामस्वराज्याच्या कामाला सुरवात केली. बाबा रेडीकरानी आबा कांबळे यांना सार्वजनिक जीवनात ओढले. म्हणूनच त्यांनी बाबा रेडीकरांचे नाव देऊन ग्रामस्वराज्याच्या कामासाठी गो-सेवेची स्थापना केली.
महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष व मालेगाव जिल्हा नाशिक येथील डॉ. सुगन वरंट यांचे कानापर्यंत या गो-सेवेच्या कार्याची वार्ता गेली. महाराष्ट्रातील थोर गो भक्त मालेगावच्या जमनाबेन कुटमुटीया यांचे डॉ. वरंट हे शिष्य काटे भोगावातील गो- सेवेची माहिती कळताच ते पठारावरती आले. तेथे कार्यकर्त्यांच्या निवासासाठी एक आणि गायींसाठी एक अशा गवत आणि कुडामेंढीच्या दोन झोपड्या होत्या. त्यांनी या संपूर्ण कामाची माहिती घेतली व परिसर पाहिला त्यावेळी १५ ते २० गायी होत्या. भाकड म्हणून लोकांनी सोडलेल्या वृद्ध गायी, निरुपयोगी म्हणून व मरण्यासाठीच संस्थेकडे पाठविलेल्या बऱ्याच गायी चार वर्षात मृत झाल्या होत्या. त्यांचा दफनविधी यथासांग संस्थेच्या वतीने होत होता. लोकांचा एकच प्रश्न असायचा, तुम्ही कशासाठी हे करता? तुम्हाला याचा काय फायदा? जीवनात फायदा तोटा बघणारी व्यवहारी माणसे दुसरे विचारणार तरी काय. टिंगल टवाळ्या होतच होत्या. डॉ. वरंट यांनी दोन दिवस मुक्काम केला. इथ काहीतरी रंगीत चित्र उभा राहील अस ते म्हणाले व आपल्या सदिच्छा देऊन समाधान व्यक्त करून त्यांनी निरोप घेतला.


जमनाबेन लोकसेवक पुरस्कार

डॉ. सुगन वरंट मालेगावच्या गो विज्ञान संस्थेचे सचिव होते. मालेगावच्या गो विज्ञान समितीमार्फत दरवर्षी विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिला जमनाबेन लोकसेवक पुरस्कार देत असते. डॉ. वरंट आणि समितीने त्या वर्षाचा म्हणजे २००२ सालचा तो पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबा कांबळे याना जाहीर केलेची बातमी आली आणि तो पुरस्कार कोल्हापूर येथे शाहू सभागृहामध्ये न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे हस्ते आबा कांबळे यांना देण्यात आला. कोल्हापूरच्या सर्व वर्तमानपत्रातून याची खूप प्रसिद्धी झाली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या कामाचा खूप बोलबाला झाला. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक गो भक्तांचे लक्ष या प्रसिद्धीने तामजाई पठारावरील बाबा रेडीकर गो-विकास संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या गो-सेवेकडे वेधले गेले. हुपरी येथील एल.वाय. पाटील ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात चांगली कामे करणाऱ्या अनेकांचा गौरव केला जातो. त्यांच्या ट्रस्टच्यावतीने आबा कांबळे यांना गो-सेवेबद्दल एल.वाय. पाटील ट्रस्टच्या वतीनेपुरस्कार दिला गेला. त्याबरोबर सहकाराच्या क्षेत्रात काम करणारे अभय दोशी यांचाही सत्कार झाला.


अभय दोशी यांचे या कामाकडे लक्ष

वर उल्लेख केल्याप्रमाणे अभय दोशी आणि आबा कांबळे यांचा परिचय पुरस्कारावेळी झाला आणि अभय दोशी यांनी आबा कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांनी चालविलेल्या गो-सेवेच्या कामासाठी आपला हातभार लावणेची इच्छा त्यांचेकडे व्यक्त केली. ते स्वतः व त्यांच्या पत्नी तामजाई पठारावर आले. त्यांनी तेथील परिस्थिती पहिली आणि गायीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे त्यांनी मनावर घेतले. आणि पठारावर एक लहानशी विहीर खुदाई केली आणि पाईप लाईन बसवून पाण्याची टाकी उभा केली व गायींना पाणी पिण्यासाठी हौद बांधला आणि हळूहळू इथल्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी संकल्प केला.


कोल्हापुरातील गो-सेवकांचे लक्ष

तामजाई पठारावरील या कामाकडे अनेक गो-सेवकांचे लक्ष गेले. व ते प्रत्यक्ष पठारावरती येऊन पाहणी करून मदतीचा हात पुढे करू लागले. काही गो-भक्तांनी तर कोणत्याही परिस्थितीची अथवा मोठेपणाची अपेक्षा न ठेवता गुप्तदान देऊन आपला हातभार लावणेचे ठरविले.


हंसराज पालडीयां यांचे योगदान

हंसराज पालडीयां हे मुळचे राजस्थानचे. ते कोल्हापुरात फर्निचरच्या व्यवसायाचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. त्यांनी गो-शाळेला भेट दिली आणि तेथे गो-शाळेची इमारत उभी करण्यासंदर्भात संस्था चालकांबरोबर चर्चा करून इमारत उभी करण्याचा संकल्प केला. आणि आपल्या जवळच्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून त्यांनी फंड जमा करणेस सुरवात केली. डोंगरमाथ्यावरती बांधकामासाठी विटा, वाळू, सिमेंट आदी साहित्य घेऊन जाणे अत्यंत जिकरीचे होते त्यामुळे स्थानिक पातळीवरती काय वस्तू जमा करता येतील याचा विचार झाला आणि हे लक्षात आले कि, या पठारावरती धनगर समाजाची घरे होती ते लोक घरे सोडून रोजीरोटीसाठी कायमचे शहराकडे व अन्य ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराचे दगड पडून आहेत. ते दगड त्यांच्या सहमतीने बांधकामासाठी जमा करावेत असे ठरले. त्याप्रमाणे जे धनगर लोक आपली घरे सोडून गेले आहेत त्यांना विचारून त्यांना नाममात्र पैसे देवून जवळपास ३५० ट्रॉली घडीव दगड दोन वर्षात जमा केले. तसेच त्यांच्या सहकार्याने एक १२५ x ३५ ची दगड वाळू सिमेंट मध्ये पक्की इमारत बांधली गेली, आणि अत्याधुनिक गोठा बांधला गेला. जवळपास दीड एकरामध्ये पक्की संरक्षक भिंत/कठडा बांधून घेतला व जवळपास १०० गायी आरामात बसतील असा पक्का गोठा उभा झाला. हा गोठा उभारण्यासाठी ज्या दात्यांनी आपण गुप्तदान म्हणजे सहकार्य केले त्यांना या आमच्या गो-शाळेच्या उभारणीमध्ये आम्ही अग्रस्थान देतो.


संचालक मंडळ

anandi kamble

सौ. आनंदी आबा कांबळे

अध्यक्ष
anandi kamble

श्री. नारायण रघुनाथ पाटील

उपाध्यक्ष
anandi kamble

सौ. प्रमिला महेश सावंत

सेक्रेटरी
anandi kamble

श्री. गणपतराव पाटील

खजानीस

संस्थेच्या रोजच्या गरजा

चाऱ्या वैरणीची व्यवस्था

भारतीय संस्कृतीमध्ये १२ वर्षाच्या काळाला एक तप म्हटले आहे. तप म्हणजे तपश्चर्या. नित्य निरंतर एकच ध्यास भारतीय वंशाच्या (देशी वंशाचा) गायीची सेवा दीड तपाचा कालावधी लोटला. काटेभोगाव, ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर सह्याद्री रांगेतील तामजाई पठारावरती पाय घट्ट रोवून, सोई सुविधांची तमा न बाळगता कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य, पाठबळ नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाश्रय नसताना सुरवातीस तीन चार वर्षे आंतरिक इच्छाशक्तीच्या जोरावरती स्थानिक नैसर्गिक सामग्री (गायींना पाणी पिण्यासाठी लहानसा झरा, झोपडी उभारण्यासाठी स्वतःची जागा आणि जंगली लाकूड फाटा, गवत पालापाचोळा) एवढाच आधार होता. आबा कांबळे, त्यांच्या पत्नी आनंदीबाई, मुलगा रमाकांत, लहान मुलगा नामानंद, सुना मंदाकिनी व सुनंदा, मुलगी प्रमिला या सर्व परिवाराने मनुष्य वस्तीपासून सुमारे चार किमी दूर वन्य पशूंच्या सहवासात डोंगरावरती राहून गो-सेवेच्या कामाला दि १८ एप्रिल १९९९ पासून सुरवात केली.

विजेची आवश्यकता

दिवसा सूर्यप्रकाश आणि रात्री चंद्राचे कलाकलाने कमी अधिक होणारे चांदणे हीच नैसर्गिक प्रकाशाची साधने आमच्याकडे आहेत. घरात तुटपुंज्या रॉकेलच्या दिव्याने उजळणारी रात्र, जंगली जनावरे तसेच बिबट्या, तरस, गवे, रानडुक्कर व सरपटणारे विषारी साप यांच्या सानिध्यात राहून गो-सेवा करणाऱ्या लोकांनी शासनाकडे विजेची मागणी केली होती. आणि त्याचा सर्व्हे झाला मात्र पुढील कार्यवाही अडून पडली आहे व पुढे काहीच प्रगती झालेली नाही. महाराष्ट्र शासनाने गो-वंश हत्या बंदीचा कायदा करून गो संरक्षणासाठी राजाश्रय दिला आहे हे कौतुकास्पद आहे. परंतु आता आमच्यासारख्या अत्यंत प्रतिकूल परीस्थित गो सेवेचे काम करणाऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची जादा आवश्यकता आहे. सद्या संस्थेकडे सौर उर्जेवर आधारित वीज पुरवठा चालू आहे. परंतु हि वीज रात्री १० पर्यंत चालते त्यामुळे अधीमधी रात्री वीज उपलब्ध होत नाही.

संस्थेची स्थापना

देवनारच्या कत्तलखान्यावरती भूदान ग्रामदानाचे जनक आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेने झालेल्या गोहत्या बंदी सत्याग्रहातून प्रेरणा घेऊन सर्वोदय कार्यकर्ते आबा कांबळे, त्यांच्या पत्नी आनंदीबाई, मुलगा रमाकांत, लहान मुलगा नामानंद, सुना मंदाकिनी व सुनंदा, मुलगी प्रमिला या सर्वांच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्ह्यातील भूदान ग्रामदान ग्रामस्वराज्य चळवळीतील जेष्ठ सर्वोदय नेते बाबा रेडीकर यांच्या नावाने कांबळे कुटुंबीयांनी बाबा रेडीकर गो-गीता सेवा संस्था स्थापन केली. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष - आबा कांबळे, उपाध्यक्ष - सरदार आंग्रे, सेक्रेटरी - दामाजी वाळवेकर, खजानीस - गणपती पाटील सर्वजन रा. काटे भोगाव, व नारायण पाटील रा. कुडित्रे, एस. के. पाटील रा. तिरपन, श्रीपतराव माळवी रा. पोहाळे, सीताराम कांबळे रा. कोल्हापूर, राम शिवगण रा. बर्की, शामराव कांबळे रा. सुळे, सौ. मंदाकिनी कांबळे रा. काटे भोगाव यांना ट्रस्टी बनवून संस्था स्थापन केली. तिचा रजिस्टर नंबर १५१९९ असा आहे. आता या संस्थेचे पदाधिकारी म्हणून पुढील लोक आहेत.



बाबा रेडीकर संस्था, काटे भोगाव

आमची संस्था गेली १२ वर्षाहून अधिक काळ गो सेवेसाठी कार्यरत आहेत या कार्यात अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थाचे सहकार्य लाभले आहे