बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्था

भारतीय संस्कृतीमध्ये १२ वर्षाच्या काळाला एक तप म्हटले आहे. तप म्हणजे तपश्चर्या. नित्य निरंतर एकच ध्यास भारतीय वंशाच्या (देशी वंशाचा) गायीची सेवा दीड तपाचा कालावधी लोटला. काटेभोगाव, ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर सह्याद्री रांगेतील तामजाई पठारावरती पाय घट्ट रोवून, सोई सुविधांची तमा न बाळगता कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य, पाठबळ नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाश्रय नसताना सुरवातीस तीन चार वर्षे आंतरिक इच्छाशक्तीच्या जोरावरती स्थानिक नैसर्गिक सामग्री (गायींना पाणी पिण्यासाठी लहानसा झरा, झोपडी उभारण्यासाठी स्वतःची जागा आणि जंगली लाकूड फाटा, गवत पालापाचोळा) एवढाच आधार होता. आबा कांबळे, त्यांच्या पत्नी आनंदीबाई, मुलगा रमाकांत, लहान मुलगा नामानंद, सुना मंदाकिनी व सुनंदा, मुलगी प्रमिला या सर्व परिवाराने मनुष्य वस्तीपासून सुमारे चार किमी दूर वन्य पशूंच्या सहवासात डोंगरावरती राहून गो-सेवेच्या कामाला दि १८ एप्रिल १९९९ पासून सुरवात केली.

goshala

सहकार्य करणारे दानशूर

आत्मानंद जैन ग्रुप, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर या संस्थेने जवळपास रु. ३ लाख खर्च करून गव्हाण तयार करून गायींचा हा गोठा आधुनिक करून दिला.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व गायींना पक्क्या दगडांच्या भिंतीचा आसरा झाला. दरवर्षी कोल्हापूर, सांगली आणि कराड जिल्ह्यातील गो-भक्त आपआपल्या परीने चारा देऊन औषधपाणी या कामासाठी आर्थिक मदत करत असतात. यामध्ये जे अग्रेसर आहेत त्यांची नावे या ठिकाणी आम्ही घोषित केली तर निरपेक्ष भावनेने गो-सेवेच्या कामाला सढळ हाताने व कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगणाऱ्या व्यक्तींना त्याची नावे येथे लिखित स्वरुपात उजेडात आणणे आवडणार नाहीत तर नियतीच आम्हाला माफ करणार नाही. म्हणून नम्रपणे या दातृत्व असणाऱ्या आणि वारंवार आम्हाला अर्थ सहाय्य करणाऱ्या गो-भक्तांची भलीमोठी यादी होईल. तरी पण प्रत्येक ग्रुपच्या प्रमुखांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1.जयेश ओसवाल, अरिहंत जैन फौंडेशन, कोल्हापूर
2.हंशराज पालडीया, राजस्थान विश्वकर्मा समाज, कोल्हापूर
3.गोविंदभाई पटेल, पटेल मित्र मंडळ, कोल्हापूर

4.ललित गांधी, अध्यक्ष अखिल भारतीय जैन संघ
5.आत्मानंद जैन ग्रुप, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
6.संभवनाथ जैन मंदिर ट्रस्ट, कराड

7.दयारामभाई पटेल, कोल्हापूर
8.अभय दोशी, कोल्हापूर





गुगल मॅप

बाबा रेडीकर संस्था, काटे भोगाव

आमची संस्था गेली १२ वर्षाहून अधिक काळ गो सेवेसाठी कार्यरत आहेत या कार्यात अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थाचे सहकार्य लाभले आहे